चंदगड / प्रतिनिधी
नवभारत साक्षरता अभियानातील उल्लेखनिय कार्याबद्दल स्वातंत्र्यदिनी बेरडवाडा (वरगाव) शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव वरपे व नवसाक्षर आणि स्वयंसेवकांचा सत्कार चंदगडचे तहसिलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी वृषाली यादव, गटशिक्षणाधिकारी वैभव' पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश माईनकर, नगरपरिषदचे अधिकारी उपस्थित होते.
गतिमान भारताच्या विकासाच्या योजना तळागाळातील सर्व घटकांपर्यंत पोहोचाव्यात व त्यातून एक विकसित आणि प्रगल्भ भारत निर्माण व्हावा. या हेतूने भारत सरकार मार्फत नवभारत साक्षरता कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमाचा लाभ असाक्षर प्रौढांना मिळावा ह्या हेतूने बेरड वाडा (वरगांव)मध्ये सन-२०२४--२५ सालात ११५ नवसाक्षरांचे १३ गट पाडून वर्षभर स्वयंसेवकांच्या मार्फत हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून शासनाच्या नवसाक्षर परीक्षेतून सर्व परीक्षार्थी उत्तीर्ण होवून बेरड वाडा गावाने उल्लेखित कार्य केले. याकामी वि.मं. बेरडवाडा शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव वरपे ह्यांनी सर्व गट व नवसाक्षरांना वह्या, पाट्या, अंकलिपी, चटई, पेन, पेन्सील व विविध प्रेरणादायी उपक्रम स्वखर्चाने राबविले.
१२२% साक्षरता कार्यक्रमाचे उद्दिष्ट चंदगड तालुक्याने साध्य केल्याने याची दखल शासनाने घेवून चंदगड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांचा विशेष गौरव केला. चंदगड तालुक्यात एकाच वर्षात मोठे उद्दिष्ट ठेवून ते साध्य करणारा बेरड वाडा (वरगांव) गांव ठरला. याची दखल घेवून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी शासनाकडून मुख्याध्यापक बाबुराव वरपे, नवसाक्षर व स्वयंसेवक सौ. पुजा नाईक व कु. लता नाईक यांचा प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात आला.
No comments:
Post a Comment