नाम. आबिटकर यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना गुणवंत कामगार सुरेश केसरकर
चंदगड / प्रतिनिधी
राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व गुणवंत कामगार सुरेश केसरकर यांचा अवयवदान व देहदान चळवळीत सातत्याने वैशिष्ठयपूर्ण कार्य केल्याबद्दल, १५ ऑगष्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार करणेत आला.कोल्हापुर जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात हा कार्यक्रम झाला.
गुणवंत कामगार सुरेश केसरकर हे महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामधील विविध चळवळीमध्ये सातत्याने भरीव कार्य करीत असून, अनेक संस्था व संघटनांच्या पदांवर कार्यरत आहेत.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला क्रीडा, संघटना व आस्थापना तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवयवदान - देहदान चळवळीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृत्ती व्हावी, यासाठी जिल्हा, राज्य व केंद्र शासनाकडे पत्रव्यवहारांच्या माध्यमातून तसेच विविध माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करीत आहेत. शासनाच्या सर्व योजना व उपक्रम, कामगार मेळावे, कामगार शिबिरे, बाल संस्कार वर्ग, योगा वर्ग, वृक्षारोपण, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप, रक्तदान शिबिरे, पल्स पोलिओ लसीकरण, ऊसतोड कामगारांना मदत अशा प्रकारे स्वतः व मित्रमंडळींच्या माध्यमातून सातत्याने मदत करीत असतात.
कवी, साहित्यिक, लेखक, शाहीर आदींच्या लेखनाला व्यासपीठ मिळावे यासाठी, धर्मनिरपेक्ष चळवळीमध्ये त्यांचे सातत्याने योगदान असते.
संघटित व असंघटित कामगार, बांधकाम कामगार, कंत्राटी कामगार यांच्या विविध प्रश्न संदर्भात ते सातत्याने कामगार आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच राज्य शासन व केंद्र सरकारला पत्रव्यवहार व त्याबाबत पाठपुरावा करून कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. कोरोनाच्या काळात स्थानिक व परप्रांतीय कामगार वर्गाला केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांना अनेक संस्थांनी "कोरोना योद्धा" हा बहुमान देवून सन्मानीत केले आहे.
यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर चे जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगर पालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता, सहा. कामगार आयुक्त विशाल घोडके, उप जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र तेली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस उप अधिक्षक तसेच विविध विभागांचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment