चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
अडकुर ग्रामपंचायतीचे ध्वजपूजन व ध्वजारोहण गावचे प्रथम नागरिक सरपंच सचिन लक्ष्मण गुरव यांच्या हस्ते पार पाडण्यात आला. त्याचबरोबर ग्रामपंचायतीमार्फत अनोखा असा आगळावेगळा कार्यक्रम करण्यात आला.
मराठी जिल्हा परिषद च्या शाळेच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा मधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व प्रत्येक वर्गात उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना राजे शिवछत्रपती ग्रामविकास फाउंडेशन मार्फत शिल्ड व ग्रामपंचायत मार्फत प्रशस्तीपत्र देऊन त्यांना प्रोत्साहन पर गुणगौरव सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर गावातील उत्कृष्ट शेतकरी म्हणून हणमंत दत्ताजीराव देसाई यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर उत्कृष्ट कब्बडी प्रशिक्षक म्हणून शिवाजी निकम व उत्कृष्ट क्रिकेट प्रशिक्षक म्हणून दीपक देसाई, उत्कृष्ट खेळाडू म्हणून कु. अमीर फैजल शेख, उत्कृष्ट वैद्य म्हणून पारंपारिक पद्धतीने कावीळ सारख्या आजारावर झाड पाल्याचे औषध देणारे गावातील प्रसिद्ध वैद्य शिवाजी तुकाराम अर्दाळकर, वाटंगी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे वाटंगी सारख्या ठिकाणी १८ राज्यस्तर पुरस्कार प्राप्त करून देणारे व राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामविकास अधिकारी रणजीत नारायण पाटील यांचा सत्कार करण्यात आला
त्याचबरोबर अडकूर ग्रामपंचायतचे सदस्य अभिजीत देसाई यांना उत्कृष्ट सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. अनाथ मुलांना सहकार्य करणारे सुशांत परीट व मनोज परीट व इतर म्हणून या वरील सर्वांचा गौरव शिल्ड व सत्कार यावेळी करण्यात आला. ग्रामपंचायतीकडील आर्थिक वर्षात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर भरणारे नागरिक म्हणून नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये अभय देसाई, रमेश शंकर सोनार, दशरथ मोरबाळे, सुरेश ज्योती आपटेकर, श्रीमती श्वेता शिवाजी भेकणे यांचा समावेश होता.
स्वातंत्र्य दिनाला ग्रामपंचायत सदस्य, सदस्या गावातील आजी, माजी सैनिक, गावातील सर्व नागरिक, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, गावातील शिवशक्ती हायस्कूलचे विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम संपन्न झाला. सूत्रसंचालन ग्रामपंचायतीच्या क्लार्क शिरीन शेख यांनी केलं.
No comments:
Post a Comment