मराठा आरक्षण मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या विराट मोर्चात सामील व्हा! मराठा संघटनांनी काय केले आवाहन? वाचा....... - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2025

मराठा आरक्षण मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या विराट मोर्चात सामील व्हा! मराठा संघटनांनी काय केले आवाहन? वाचा.......

  


कोल्हापूर : सी एल वृत्तसेवा 

       मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळण्यांकरिता मराठा समाजाचे लढवय्ये व झुंजार नेते मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे होणाऱ्या समस्त मराठा समाजाच्या प्रचंड व विराट मोर्चामध्ये बहुसंख्येने सहभागी होणेबाबत संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी बैठकांचा धडाका सुरू आहे.

      या सर्व बैठकांमधून आंदोलनाकरीता मुंबईला जाणेसंबंधी सकारात्मक चर्चा होत आहेत. तथापि आपण पूर्ण ताकदीने निघणेसंबंधी कोणताही कृती कार्यक्रम निश्चित करीत नाही किंवा नियोजन ठरवित नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे आपण मोर्चासाठी किती संख्येने निघू हे स्पष्ट झालेले नाही. याकरिता प्रत्येक गावांतून/शहरांतून ज्या बांधवांनी मोर्चासाठी मुंबईला जाण्याचे १००% ठरविले आहे;  त्या सर्वांनी आपली पूर्ण माहिती ग्रुपवर शेअर करून सर्वांना अवगत करावे ही विनंती. या माहितीमध्ये गाववार प्रत्येकांची पूर्ण नावे, ग्रुप लीडरचे नाव, मोबाईल नंबर, गाडी नंबर, वाहन स्वताचे खाजगी किंवा भाड्याचे, किती तारखेला निघणार? इत्यादीं बाबींचा तपशील असावा.

    तसेच या मोर्चामध्ये बहुसंख्य समाज बांधव सहभागी व्हावेत व मराठ्यांचा यल्गार यशस्वी व्हावा याकरीता स्वेच्छेने पाठबळ देऊ इच्छिणारे तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या समाज बांधवांनी स्वखर्चाने जाणाऱ्या समाज बांधवांना वाहन व्यवस्था करावी. अशा समाजाप्रती योगदान देणेसाठी तयार असणांऱ्या बांधवांनी तात्काळ ग्रुपवर स्वतःहून व्यक्त व्हावे. अशी संबंधितांना समाजाच्यावतीने नम्र विनंती आहे.

          ज्या समाज बांधवांना अगदी मनापासून या मोर्चामध्ये सहभागी व्हायचे आहे परंतु आर्थिक अडचणींमुळे शक्य नाही, अशा बांधवांनीही आपल्या माहितीसह नावांची नोंदणी करावी अशीही नम्र विनंती मराठा समाजाच्या विविध संघटना व सकल मराठा समाज मराठा आरक्षण समिती, मुंबई मोर्चा संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment