श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल माणगाव मध्ये मेडलाईन इंडिया व संवेदना फांऊडेशन यांचेकडून 'ग्लोबल क्लासरूम ' चे उद्‌घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2025

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल माणगाव मध्ये मेडलाईन इंडिया व संवेदना फांऊडेशन यांचेकडून 'ग्लोबल क्लासरूम ' चे उद्‌घाटन

  

संवेदना फाऊंडेशन व मेडलाईन इंडिया यांच्या वतीने देण्यात आलेल्या ग्लोबल क्लास रुमचे उद्घाटन करताना हरिष पोवार व मान्यवर

तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा

    श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल माणगाव (ता. चंदगड) येथे  मेडलाईन इंडिया व संवेदना फांऊडेशन आजरा यांचेकडून 'ग्लोबल क्लासरूम ' चे उद्‌घाटन करण्यात आले .

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी गोंविंद सांवत होते. प्रारंभी सरस्वती  फोटोचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रास्तविक  सटूप्पा आप्पाणा फडके यांनी केले. ग्लोबल क्लास रूम चे उद्‌घाटन  हरिश पोवार  कार्यकारी संचालक, संवेदना फाऊंडेशन यांच्या हस्ते झाले. डिजिटल वर्ग खोल्या चे उद्‌घाटन सरपंचा सौ रेणुका नरी  यांच्या  हस्ते झाले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अनिल आप्पासो सुरुतकर संचालक नवमहाराष्ट्र माणगांव  सुरेश बेनके, दयानंद सलाम, एम. टी. कांबळे,  दता बेनके, रामचंद्र सांवत, मुख्याध्यापक के. बी. नाईक व मान्यवर उपस्थित होते. अनिल सुरूतकर, हरिश पोवार,  संताराम केसरकर,  या मान्यवरांनी  आजच्या आधुनिकी युगात संगणक व डिजीटल वर्ग या विषयी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी. के. पाटील यांनी केले तर आभार  एम. टी. कांबळे  यांनी मानले.


फोटो -


संवेदना फाऊंडेशन व मेडलाईन इंडिया यांच्या वतीने देण्यात आलेल्या ग्लोबल क्लास रुमचे उद्घाटन करताना हरिष पोवार व मान्यवर

No comments:

Post a Comment