महिलांनी विवीध कौशल्यै आत्मसात करावीत - वृक्षाली यादव - चंदगड लाईव्ह न्युज

10 August 2025

महिलांनी विवीध कौशल्यै आत्मसात करावीत - वृक्षाली यादव

 


चंदगड: सी एल वृत्तसेवा
      महिला शक्तीमध्ये समाज घडविण्याची मोठी ताकद आहे. महिलांनी एकत्र येवून केलेले विवीध उपकम यशस्वी केले आहेत त्याच पध्दतीने बचत गटाच्या माध्यमातून किंवा कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध कौशल्ये आत्मसात करून महिलांनी आर्थिक स्वावलंचन साधायला हवे असे मत चंदगड पंचायत समितीच्या नुतन गट विकास अधिकारी वृक्षाली दादासो यादव यांनी व्यक्त केले-माणगांव ता. चंदगड येथे केंद्र शासनाच्या १५ वा वित्त आयोग निधीमधून गावातील सर्व महिला व किशोरवयीन मुलीसाठी कौशल्य विकास कार्यकम राचविणे व व्यवसाय मार्गदर्शन शिवीराच्या शुभारंभ प्रेमगीत्या बोलत होत्या.
      कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी माणगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सी. रेणका प्रकाश नरी होत्या. स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी  श्रीधर भोगण यांनी केले.  अनिल शिवणगेकर यांनी आपल्या मनोगतातून महिलांनी विविध कौशल्ये आत्मसात करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी  रंगुताई चिंचणगी व  संचिता फडके यांनी आपले मनोगत व्यक्त केली. यावेळी  सरपंच  रेणूका  नरी म्हणाल्या गावातील या प्रशिक्षणाचा पुरेपुर फायदा घ्यावा व महिलांचा सहभाग वाढवून महिला सक्षमीकरण होवुन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे. व आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवाव्यात. या प्रसंगी कलावती चहुउदेशीय सेवाभावी संस्था गडहिंग्लज संचालक शितल सासणे व  विनोद सासणे यांनी कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत विविध प्रशिक्षणे प्रात्यक्षिकासह सादर केली.
       यावेळी माजी उपसभापती सुमन  बेनके  ग्रामपंचायत सदस्य  सुनिल सुरूतकर,  रघुनाथ कांबळे,  संजय फडके,  संदिप बेनके, सदस्या  शांता पिटुक,  रेणूका परसू नरी,  शोभा ससेमारी,  अलका कुंभार,  वनिता सावंत,  लक्ष्मी चिंचणगी,  प्रकाश नरी गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, महिला बचत गटातील सर्व सदस्या, ग्रामपंचायत कर्मचारी  माया माने,  जोतिबा कुंभार,  आप्पासो कांवळे, श्रीकांत कुंभार, गजानन सुरूतकर, आप्पाजी सुतार इत्यादी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार उपसरपंच . बाबुराव दुकळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment