चंदगड/प्रतिनिधी
९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधुन रामपुर (ता.चंदगड) येथील नागरिक व विद्यामंदिर बेरड वाडा शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव वरपे यांनी
भटक्या समाजातील नागनवाडी ,शिरगांव ,हेरे ,पाटणे फाटा व हलकर्णी फाटा परिसरातील ४० भटक्या समाजातील कुटूंबांना मिठाई व जीवनावश्यक साहित्य तांदुळ,रवा ,साखर,बटर,बिस्किटेव मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणेत आले.कागल तालुक्यातील पी.एम.श्री विद्यामंदिर गोरंबे शाळेत शिकत असलेल्या सन २०२५ साला तील भटक्या लमान समाजातील विद्यार्थी व विद्यार्थीनींना भरीव आर्थिक मदत श्री वरपे यांनी यावेळी करुन त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा दिली. .विविध सण समारंभ, स्वातंत्र्यदिन,प्रजासत्ताक दिन ,दिवाळी सण,यावेळी मिठाई ,नवीन कपड्यांचे वाटप,अतिवृष्टी काळात जीवनावश्यक साहित्याचे वाटप प्रतिवर्षी करुन त्यांना एकप्रकारे प्रेरित केले जाते.यांशिवाय मुलांना प्रती वर्षी शैक्षणिक साहित्य व कपडे देवून त्यांना प्रेरित करणेचे कार्य गेली पंचवीस वर्षे श्री वरपे करतात. त्यांच्या प्रेरणेने भटक्या समाजातील अनेक मुले शाळेत दाखल होवून शिक्षण घेत आहेत.बागिलगे गणेश मंडळच्या कार्यकर्त्यांना फुलझाडांचे वाटप करुन त्यांना पर्यावरण रक्षण व संवर्धन साठी प्रेरित केले.यांसाठी सहकार्य सौ.शारदा वरपे, साहील वरपे,सायली वरपे यांनी केले.
No comments:
Post a Comment