मांडेदुर्ग येथे ९ ऑगस्ट 'क्रांती दिन' विविध कार्यक्रमाने संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

10 August 2025

मांडेदुर्ग येथे ९ ऑगस्ट 'क्रांती दिन' विविध कार्यक्रमाने संपन्न

मांडेदुर्ग ता. चंदगड येथे क्रांती दिनानिमित्त माजी सैनिक सुभेदार रामचंद्र पाटील यांचा सत्कार करताना खेडूत चे संचालक एम एम तुपारे 

चंदगड / प्रतिनिधी
       मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील श्री हनुमान विद्यालयात ९ ऑगस्ट क्रांती दिनी  रोजी क्रांती दिनानिमित्त विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आला. या कार्यक्रमात आजी-माजी सैनिकांचा सन्मान, दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच मांडेदुर्ग व ढोलगरवाडीच्या पंचक्रोशीत पाचवी शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन करणारे व यावर्षी दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीधारक बनवणारे शिक्षक- शिक्षिका यांचा विशेष सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन एन.के. पाटील हे होते. कार्यक्रमाला खेडूत शिक्षण मंडळचे,  संचालक  एम. एम. तुपारे, एस. एम. फर्नांडिस यांची प्रमुख प्रमुख उपस्थिती होती. तसेच शालेय समितीचे सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व दीपप्रज्वलनाने झाली. मुख्याध्यापक  पी.टी. वडर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करत शाळेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शिक्षकांचे योगदान आणि आजी-माजी सैनिकांची भूमिका यावर विशेष भर दिला.क्रांती दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या क्रांतिकारकांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय एम एम तुपारे व एस एम फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले.
   याप्रसंगी माजी सैनिकांना पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी उपस्थित सर्व माजी सैनिकांना राखी बांधून सन्मान केला. इयत्ता दहावीच्या उच्च गुणप्राप्त विद्यार्थ्यांना पुस्तके व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यशस्वी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एल.बेळगावकर यांनी ओघवत्या शैलीत केले, तर आभार एम.एम. कांबळे यांनी मानले. वंदे मातरम् गीतानंतर कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाला शालेय समितीचे सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment