![]() |
म्हाळेवाडी येथे कै नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना माजी आमदार राजेश पाटील व उपस्थित कार्यकर्ते. |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
नरसिंगराव पाटील यांचे कार्य, त्यांचे लढवय्या नेतृत्व, व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांची अखंड झटणारी वृत्ती यामुळे ते अजरामर आहेत. ते केवळ राजकारणीच नव्हते, तर दूरदृष्टी असलेले समाजसेवक होते. असे प्रतिपादन चंदगडचे माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी केले. ते आज म्हाळेवाडी, ता. चंदगड येथे झालेल्या माजी आमदार कै नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
प्रास्ताविक प्रा. सुखदेव शहापूरकर यांनी केले. पुढे बोलताना राजेश पाटील म्हणाले, दौलत साखर कारखान्याच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. शेतकरी व सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी अहोरात्र प्रयत्न केले मात्र त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी वाईट दिवस आले. कारखान्यासाठी त्यांनी मुंबईत आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या काळात कारखान्याने उत्पादनवाढ, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, तसेच सभासदांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या होत्या. शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातही सदैव अग्रेसर होते. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा उभारणे, रस्ते, धरणे, पाणी व शाळांची उभारणी केल्यामुळेच सामान्य जनतेच्या हृदयात त्यांचे स्थान अढळ आहे.
त्यांची प्रेरणा कार्यकर्त्यांनी कायमपणे जपावी असे आवाहन राजेश पाटील यांनी केले. यावेळी तालुका संघाचे उपाध्यक्ष तानाजी गडकरी व माने पाटील अभय देसाई, कल्लाप्पा भोकर, बंडू चिगरे, विनोद पाटील, सुष्मिता पाटील, निखिल पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते तसेच म्हाळेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित आणि नरसिंगराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तालुक्यात अनेक ठिकाणी विविध उपक्रमांनी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
No comments:
Post a Comment