कोवाड : सी एल वृत्तसेवा
निवृत्त मुख्याध्यापक व तुडिये केंद्राची माजी केंद्रप्रमुख शामराव सिद्धाप्पा पाटील, मुळ गाव कालकुंद्री (सध्या रा. वडगाव- बेळगाव) यांनी कागणी येथील कॅन्सर ग्रस्त रुग्ण कल्लाप्पा कांबळे उपचारासाठी रोख रुपये ५ हजार व गणेशोत्सवानिमित्त धान्य शिधा मदत केली. सरस्वती विद्यालय कालकुंद्री दहावी बॅच १९८१ यांनी केलेल्या आर्थिक मदतीची बातमी वाचून आपली दिवंगत पत्नी काही सौ सुजाता यांच्या स्मरणार्थ ही मदत केली. कागणी येथे भेट देऊन कांबळे कुटुंबीयांच्याकडे ही मदत सुपूर्द केली. यावेळी त्यांच्यासोबत दहावी बॅच विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष दैनिक पुढारीचे पत्रकार व चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, शंकर कोले, परशराम गायकवाड (कालकुंद्री), शिवाजी तारीहाळकर, गणेश गुरव (कागणी) उपस्थित होते.
No comments:
Post a Comment