![]() |
चंदगड - दि न्यु इंग्लिश स्कुलमधील विद्यार्थ्यी-विद्यार्थ्यींनी गणेशमुर्तीसह. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे आयोजित “इको-फ्रेंडली गणपती स्पर्धा” मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी सुनील काणेकर यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “शालेय जीवनातच पर्यावरण-जागरूकता निर्माण होणे ही काळाची गरज असून अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळतो.”
या स्पर्धेत एकूण ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लहान गटात संभव कुंभार, शिवतेज कुंभार, आर्यन गावडे, वरद तोरस्कर, कार्तिकी गावडे यांनी तर मोठ्या गटात निधी पाटील, सिद्धार्थ देसाई, सोहम सुतार, शुभम कुंभार व प्रतीक कुंभार यांनी क्रमांक पटकावले. विजेत्यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, खजिनदार अनंत सुतार, अॅड. विजय कडूकर आदी मान्यवर उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्रा. व्ही. के. गावडे, प्रा. एस. एम. निळकंठ व प्रा. एस. एस. नेवगे यांनी काम पाहिले. या उपक्रमात उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे, जेष्ठ शिक्षक व्ही. के. गावडे,भाग्यश्री पाटील तसेच जे. जी. पाटील, सुहास वर्पे, विद्या डोंगरे, वर्षा पाटील, ओंकार पाटील, आकाश चव्हाण, रविंद्र कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले तर आभारप्रदर्शन शरद हदगल यांनी केले. या स्पर्धेत पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्तींमधून पर्यावरणप्रेम आणि नवकल्पनांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
No comments:
Post a Comment