![]() |
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटातील यशस्वी ठरलेल्या मुलींसोबत तालुक्यातील क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक |
चंदगड / सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुका स्तरीय शासकीय बुद्धिबळ स्पर्धा नुकत्याच धनंजय विद्यालय नागणवाडी ता. चंदगड येथे पार पडल्या. या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुले गटात छत्रपती शहाजी हायस्कूल पाटणे शाळेचा कुमार चिन्मय जोतिबा मस्कर व 14 वर्षाखालील मुलींच्या गटात कुमारी समृद्धी शिवाजी गावडे या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. त्यांची नृसिंहवाडी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एन. जे. लांडे, क्रीडाशिक्षक नरेंद्र हिशेबकर व पालकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून संस्थेचे सचिव तथा माजी आमदार राजेश पाटील यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले.
No comments:
Post a Comment