कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
किणी (ता. चंदगड) येथील जय कलमेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मार्फत गणेशोत्सव निमित्त दिनांक 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर अखेर खुल्या रांगोळी, रेकॉर्ड डान्स, निबंध व सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी 11 वाजता खुल्या रांगोळी स्पर्धांचे करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे सहा विजेत्यांना 2001 ते 301 रुपये रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत. दिनांक 1 सप्टेंबर रोजी रात्री 8.00 वाजता खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेतील अनुक्रमे सहा विजेत्यांना 5001 ते 1001 रोख बक्षीचे व चषक देण्यात येणार आहेत.
बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता तालुकास्तरीय निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. निबंधासाठी एक तास वेळ असून शब्द मर्यादा 250 ते 300 राहील. यातील सात विजेत्यांना अनुक्रमे 1501 ते 101अशी बक्षिसे असून निबंधासाठी गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप, शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर, मोबाईल उपयोग की दुरुपयोग, आजची तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात, स्वच्छ भारत सुंदर भारत, महिला सक्षमीकरण आजची गरज हे विषय ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेतील अनुक्रमे सात विजेत्या स्पर्धकांना रोख रुपये 1501 ते 151 अशी बक्षीस ठेवण्यात आली आहेत.
गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता इयत्ता चौथी ते सहावी व सातवी ते नववी अशा दोन गटात सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. लहान गटातील अनुक्रमे आठ विजेत्यांना 1001 ते 101 रुपये तर मोठ्या गटातील विजेत्यांना 2001 ते 351 रुपये अशी रोख बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. सामान्य ज्ञान स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेचे ओळखपत्र दाखवणे अनिवार्य आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी संजय कुट्रे, संभाजी हुंदळेवाडकर, सुनील मनवाडकर, गजानन मनगुतकर, प्रभाकर सुतार यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment