चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार अमोल कुरणे यांनी कोल्हापूरातील सत्यशोधक लीगल असोसिएट ऑफिसला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी ॲड. भारती गावडे-पाटील व ॲड. सुनिता कोळेकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमोल कुरणे म्हणाले “ ॲडव्होकेट भारती गावडे-पाटील (उर्फ सौ.सुजाता गुंडुराव कांबळे) यांनी अल्पावधीतच वकिली क्षेत्रात उल्लेखनीय नावलौकिक मिळवला आहे. वंचित, शोषित, गोरगरीब व बहुजन समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. चंदगडसारख्या दुर्गम भागातून येऊन त्यांनी कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. आज कोल्हापूरात वकिली क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांची जिद्द, संघर्षशीलता व सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी आहे. मला खात्री आहे की, त्यांच्या माध्यमातून न्यायव्यवस्था सामान्य नागरिकांसाठी अधिक बळकट होईल.``
कायद्याचा व्यवसाय हा केवळ करिअर नसून सामाजिक न्यायाची मोठी जबाबदारी आहे. सत्यशोधक विचारधारेवर आधारित काम करणारे वकील हेच खऱ्या अर्थाने न्यायव्यवस्थेचे रक्षक आहेत. या कार्यात आम्ही समाज कार्यकर्ते त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहू.” यावेळी भारताचे संविधानाची उद्देशिका देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते प्रशांत अवघडे व इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आभार प्रा. डॉ. गुंडुराव कांबळे व सृष्टी कांबळे यांनी मानले.
No comments:
Post a Comment