मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी चंदगड येथील संभाजी चौकात मराठा बांधवांचे आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

29 August 2025

मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी चंदगड येथील संभाजी चौकात मराठा बांधवांचे आंदोलन

मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी चंदगड येथील संभाजी चौकात जमलेले मराठा बांधव. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या पुढाकाराने  मुंबई येथे आंदोलन सुरू केलेले आहे. त्यांच्या समर्थनात चंदगड येथील धर्मवीर संभाजी चौक येथे मराठा बांधवांनी घोषणा देत आंदोलन केले.

    मराठा महासंघ तालुका अध्यक्ष सुरेश सातवणेकर यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली. प्रा. एस. व्ही. गुरबे यांनी मराठा समाजाला आरक्षण का हवं आहे याबाबतीत माहिती सांगितली. चंदगड तालुका मराठा महासंघ सरचिटणीस राजाराम सुकये यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोग नेमून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध केले होते. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही कालावधीत त्यांच्या आयोगाने मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध केले असताना तुम्ही आरक्षण का देत नाही, अशी विचारणा केली. तसेच लक्ष्मण गावडे यांनीही आपले विचार मांडले. कार्याध्यक्ष सुधाकर पाटील यांनीही मराठा आरक्षणाची सुरुवात व सध्या चालत असलेले आरक्षण आंदोलन याबद्दल माहिती दिली. या ओळी मराठा समाजाने अनेक घोषणा दिल्या 

     दलित समाजाने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे, असे पत्र देण्यात आले. मुस्लिम समाज ही मराठा समाजाच्या आरक्षणा समर्थनात आहे, असे फिरोज मुल्ला यांनी सांगितले. सदर आंदोलनामध्ये अनेक मराठा बांधव, मुस्लिम बांधव व दलित बांधव देखील उपस्थित होते. 

    यावेळी आंदोलनामध्ये पी. के. कांबळे, संभाजी देसाई, दिलीप चंदगडकर, प्रा. आर. पी. पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघ महिला तालुकाध्यक्ष सौ. पूजा शिदे. सौ. दिपा राणे, सौ. अश्विनी मुतकेकर, कु. पुजा इंगवले, महिला अध्यक्ष पूजा शिंदे, शर्मिला पाटील, दीपा राणे, अस्मिता सावंत, राजनंदिनी पाटील, लीना सावंत, साक्षी देसाई, नीता जुळेकर, सुधा गडकरी, राजश्री गावडे, मयुरी सातवणेकर यांच्या मराठा बांधव उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment