चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत नांदवडे - शेवाळे यांनी देशाचे भविष्य असणाऱ्या मुलांचा पाया म्हणजे शिक्षण यांची सुरुवात अंगणवाडी व प्राथमिक शाळा सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधा बरोबर डिजीटल शिक्षण क्लासरुमचा शुभारंभ करण्यात आला. त्यासाठी शाळा व अंगणवाडी १०० टक्के डिजिटल करण्याचे काम ग्रामपंचायतीने केले.
तसेच स्वच्छ माझा गाव, माझे घर या संकल्पनेतून प्रत्येक घराला डस्टबिन कच्चा डबा वाटप करण्यात आले. अंगणवाडीमध्ये बसविलेल्या टी. व्ही. संचचा शुभारंभ सरपंच राजेंद्र कांबळे, उपसरपंच एन. एस. पाटील, सदस्या संगीता शिवाजी गावडे, सदस्या अस्मिता सुधाकर पाटील, सदस्या संजीवनी सुरेश सुतार, सदस्य विद्यालय पुंडलिक सुतार, नांदवडे तंटामुक्त अध्यक्ष सुधाकर पाटील, ग्रामपंचायत अधिकारी पंडित हुजरे, राजेंद्र बुवा, गोपाळ गावडे, केंद्रप्रमुख शिवाजी पाटील, श्री. मोरे, श्री. नाईक, शिक्षिका बल्लाळ व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाला.
No comments:
Post a Comment