![]() |
अडकूर येथील बलभीम ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे नोंदणी पत्र निबंधक सुजय येजरे यांच्याकडून स्वीकारताना, अभय देसाई व अन्य मान्यवर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील अडकुर येथे नव्यानेच स्थापन झालेल्या बलभीम ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित अडकूर या पतसंस्थेची नोंदणी नुकताच झाली. संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र सहकारी संस्थांचे दुय्यम निबंधक सुजय येजरे यांनी दिले.
अडकूर येथे नव्यानेच स्थापन झालेली ही पतसंस्था सभासदांचा विश्वास संपादन करून चालवावी. सभासदांचे हित विचारात घेऊन ती चालवल्यास अल्पावधीतच नावलौकिकास पात्र राहील असा विश्वास निबंधक सुजय येजरे यांनी यावेळी व्यक्त केला. गडहिंग्लज बाजार समितीचे माजी सभापती अभय देसाई यांनी नूतन पतसंस्थेच्या सर्व सभासदांचे अभिनंदन करून ही संस्था अडकुर भागासह तालुक्यात आदर्श ठरेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी संस्थेचे प्रवर्तक संचालक प्रकाश वाईंगडे, मारुती माने, तानाजी वाईंगडे, भीमराव कांबळे, सखाराम माळकरी, दीपक अडकूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment