चंदगड / सी एल वृतसेवा
तुर्केवाड़ी (ता. चंदगड) येथील विद्यार्थ्याीनी कु. माहेनुर मोहम्मद गौस कर्नाची (वय- ७ वर्षे) या विद्यार्थ्यीनी वर राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत हृदय-विकाराची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत डॉ पल्लवी निंबाळकर आणि डॉ देवराज सुतार यांना शालेय आरोग्य तपासणी दरम्यान कु. माहेनुर कर्नाची हिला हृदयविकार असल्याचे आढळून आले. त्यांनी शिक्षकांना या बाबत कल्पना देऊन तिच्या पालकांशी संपर्क साधला. ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. जोहेब मकानदार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. जी. सोमजाळ यांचा सल्ला घेऊन प्राथमिक तपासणी करून तिला २-डी इको साठी डॉ. अनुप बार्देस्कर यांच्याकडे पाठविले. त्यानंतर कु. माहेनूर हिच्या पालकांनी दि. ५ ऑगस्ट रोजी हृदय शस्त्रक्रियेसाठी के एल ई रुग्णालय बेळगाव येथे दाखल होण्याचा निर्णय घेतला. दि ११ ऑगस्ट रोजी कु. माहेनूर ची हृदय शस्त्रक्रिया के एल ई हॉस्पिटल मधील हृदय विकार तज्ञ डॉ गणंजय साळवी यांनी यशस्वी केली. ह्या शस्त्रक्रिये साठी विनायक पुराणिक यांचे सहकार्य लाभले. कु. माहेनूर च्या आरोग्य तपासणी दरम्यान वैद्यकीय पथकातील फार्मसिस्ट कृष्णकांत परिट आणि परिचारिका छाया पुजारी यांचे सहकार्य लाभले. माहेनुर च्या कुटुंबियांनी चंदगड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जोहेब मकानदार, डॉ. पल्लवी निंबाळकर, डॉ. देवराज सुतार यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment