जय जवान दूध संस्थेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल संजय पाटील यांचे स्वागत करताना माजी चेअरमन महादेव पाटील
कोवाड / सी एल वृत्तसेवा
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील जय जवान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या चेअरमन पदी संजय केदारी पाटील यांची तर व्हा चेअरमन पदी सौ साधना नारायण पाटील यांची निवड झाली .
माजी आमदार राजेश पाटील यांच्या गटाची असलेल्या दूध संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत चेअरमन पदासाठी संजय पाटील यांचे नाव संचालक सुनिल पाटील यानी सुचवले तर संचालक दिपक पाटील यानी अनुमोदन दिले . यावेळी ब्रम्हलिंग दूध संस्थेचे चेअरमन संजय गडकरी , अशोक पाटील , प्रा गुरुनाथ पाटील ,दत्तात्रय पाटील , मारुती पाटील ,पी डी भिंगुडे , राजेंद्र भिंगुडे, माजी चेअरमन महादेव पाटील , मनोहर भिंगुडे, नारायण गडकरी , तानाजी कुंभार , विश्वास कांबळे , सौ सुजाता पाटील हे संचालक ,सचिव पिराजी हेंडोळे आदि मान्यवर उपस्थित होते . संस्थेच्या सर्व सभासद व संचालकानी माझ्यावर विश्वास ठेवून चेअरमनपदाची संधि दिली आहे . संस्थेच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या हितासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी चेअरमन संजय पाटील यानी यावेळी बोलताना सांगीतले.
No comments:
Post a Comment