दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

12 August 2025

दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ उत्साहात साजरा

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिन "राष्ट्रीय ग्रंथपाल दिन" म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. पी. पाटील होते. डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ अध्यापक व्ही. के. गावडे यांनी केले.

    उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी वाचनाचे महत्त्व स्पष्ट करताना डॉ. रंगनाथन यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. प्रमुख पाहुणे जे. जी. पाटील यांनी – "नवनवीन पुस्तकांची सोबत करू, दिवसागणिक वाचन वाढवू, आणि मायमराठीचा लौकिक वृद्धिंगत करू" असा संदेश दिला.

    ग्रंथपाल शरद हदगल यांनी – "आज निश्चय करू या, आपण सारे वाचू या, वाचनसंस्कृती जोपासू या" असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष संजय साबळे, टी. व्ही. खंदाळे, सुहास वर्पे, विद्या पाटील, वर्षा पाटील, वैशाली पाटील, ओंकार पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आदिती सूर्यवंशी हिने केले तर आभार रोहन कुंभार याने मानले.

No comments:

Post a Comment