कोवाड : सी एल वृत्तसेवा
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संचलित कोवाड सेंटरच्या वतीने केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड (ता. चंदगड) येथे दि. १३/०८/२०२५ रोजी रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सेंटरच्या संचालिका ब्रह्माकुमारी मनीषा बहनजी यांनी रक्षाबंधन सणाबद्दल शास्त्रीय, पौराणिक, अध्यात्मिक माहिती व सणाचे महत्त्व सांगितले. स्वागत मुख्याध्यापक जानबा अस्वले यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोवाड चे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कुंभार यांनी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा यादव, माजी केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील, अध्यापक गणपती लोहार, श्रीकांत आप्पाजी पाटील, अध्यापिका कविता पाटील, जयमाला पाटील, भावना आतवाडकर, मधुमती गावस, ब्रह्माकुमारी सरस्वती यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ब्रह्माकुमारी सेंटरच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आले.
No comments:
Post a Comment