![]() |
पाककृती कार्यक्रमांतर्गत मांडलेल्या पदार्थांसोबत अंगणवाडी सेविका व मान्यवर |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
माणगाव (ता. चंदगड) प्राथमिक आरोग्य केंद्र माणगाव येथे पोषण आहार अभियान कार्यक्रम घेण्यात आला. एकात्मिक बाल विकास प्रकल्प चंदगड अंतर्गत माणगाव बीट मधील अंगणवाडी सेविका यांनी विविध सकस खाद्य पदार्थ प्रदर्शनात मांडले होते. पर्यवेक्षिका वनिता इस्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात खाद्यपदार्थांचे प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच नरी यांनी केले. यावेळी ग्रामसेवक श्रीधर भोगण ग्रामपंचायत सदस्य अनिल शिवणगेकर व आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सरिता दीपक बुरुड यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment