माडवळे शाळेच्या अध्यापिका रंजिता देसुरकर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2025

माडवळे शाळेच्या अध्यापिका रंजिता देसुरकर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 

सौ. रंजिता विठ्ठल देसूरकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    माडवळे (ता. चंदगड) येथील प्राथमिक  शाळेच्या  उपक्रमशील अध्यापिका सौ. रंजिता विठ्ठल देसूरकर यांना कोल्हापूर जिल्हा परिषद कडून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करणेत आले.

    आपल्या सेवेच्या 18 वर्षे काळात विद्यामंदिर तुडये, वरगांव व माडवळे शाळांमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे विद्यार्थी विकासाच्या अनेक संकल्पना राबवून आपल्या शैक्षणिक कार्याचा ठसा त्यांनी शिक्षणक्षेत्रात उमटवला. यामध्ये राज्यस्तरीय रंगोत्सव कार्यक्रम एस.सी.आर.टी.पुणे येथे विद्यार्थ्यासह सादरीकरणात बक्षीस व सन्मान पत्र देवून कौतुक. पुणे विभाग स्तरिय शिक्षण परिषदेत शिक्षण मंत्री दादासाहेब भूसे यांचे उपस्थित उत्कृष्ठ उपक्रमाचे सादरीकरण. जिल्हा परिषद कोल्हापूर -येथे आनंददायी कृती पुस्तिका मध्ये मार्गदर्शक विविध कृतींचा समावेशाचे सादरीकरण. माझी डिजिटल क्युआर कोड स्वनिर्मिती पुस्तिका माध्यमातून आनंददायी शिक्षण. नवोपक्रम उपक्रमात जिल्हास्तरीय उज्वल यश. शाळेत मास्क व हाँडवाश तयार करणे उपक्रम. ऑनलाईन शिक्षण, सुंदर परसबाग, विविध प्रशिक्षणात शिक्षक व पालकांना मार्गदर्शन, विद्यार्थी गुणवत्ता विकासाच्या विविध योजना, अशा शालेय गुणवत्ता विकासाच्या कार्याची दखल घेवून सन २०२४-२५ चा जि.प.कोल्हापूर कडील आदर्श शिक्षिका पुरस्कार देवून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

    या त्यांच्या यशामध्ये त्यांचे पती विठ्ठल देसुरकर, चंदगड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सुभेदार, शिक्षण विस्तार अधिकारी सुनित चंद्रमणी, शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव माईनकर, शिक्षक समिती चंदगड तालुका अध्यक्ष धनाजी पाटील, कारवे  केंद्रप्रमुख आप्पाराव पाटील, मुख्याध्यापिका सौ. कल्पना नार्वेकर यांचे सहकार्य लाभले. 

No comments:

Post a Comment