१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या १५ दिवसाच्या कालावधीमध्ये महसुल सेवा पंधरवडा आयोजित केला आहे. या सेवा पंधरवड्यामध्ये महसूल विभागाच्या वतीने गावोगावी पाणंद रस्ते खुले करणे व नकाशावर घेणे, वहिवाटीचे रस्ते नकाशावर घेणे हे कार्यक्रम आपण राबवलेले आहेत. याच अनुषंगाने चंदगड येथील रवळनाथ मंदिर हॉलमध्ये गुरुवारी २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती तदसिलदार राजेश चव्हाण यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी तालुक्याचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार राजेश चव्हाण उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
चंदगड तालुक्यामध्ये आत्तापर्यंत जे हेरे सरजांम आदेश दिले होते, त्याचेही वाटप होणार आहे. लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत ज्या पत्नींची नावे सातबारा वर लावलेली आहेत. अशा महिलांना सातबाराचे वाटप होणार आहे. संजय गांधी लाभार्थ्यांना लाभाचे वितरण होणार आहे, वारस फेरफार, यासह उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, डोमेसिअल दाखले यांचे वाटप होणार आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यातील नागरीकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीन केले आहे.
No comments:
Post a Comment