चंदगडमध्ये सेवा पंधरवडा उपक्रमास प्रारंभ, महसूल प्रशासन लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याचा उद्देश - चंदगड लाईव्ह न्युज

19 September 2025

चंदगडमध्ये सेवा पंधरवडा उपक्रमास प्रारंभ, महसूल प्रशासन लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याचा उद्देश

 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमाला चंदगड तहसील कार्यालयात बुधवारी सुरुवात झाली. यावेळी लक्ष्मी मुक्ती योजनेतील सामार्थ्यांना सातबारा, जात दाखले व उत्पन्न दाखले तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

    हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत २ ऑक्टोबरपर्यंत राज्यभर राबवला जाणार आहे. या कालावधीत महसूल विभागाचे नियमित कार्यक्रम मोहीम स्वरूपात युद्धपातळीवर राबवण्यात येणार आहेत तहसीलदार राजेश चव्हाण यांनी सेवा पंधरवड्यातील उपक्रम तीन टप्प्यांत राबविले जाणार आहेत. यामध्ये पाणंद रस्ते विषयक मोहीम,योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी पूरक उपक्रम, महसूल प्रशासनामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम असून ठळक कार्यक्रम ग्रामशिवार फेरी, रस्त्यांची यादी तयार करणे व ग्रामसभेत मंजुरी, अतिक्रमणावरील सुनावणी व निष्कासन, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण, भूअभिलेख विभागाकडून रस्त्यांचे सिमांकन, व नकाशातील नोंदी अद्ययावत करण्यात येणार आहेत.

फेरफार अदालत घेऊन प्रलंबित प्रकरणांचा निकाल, मटक्या व विमुक्त

    जातीच्या दाखल्यासाठी विशेष शिबिरे, जिल्हास्तरीय प्लॅस्टिकमुक्ती निबंध स्पर्धा व पथनाट्य, माहिती अधिकार व सेवा हमी कायद्याबाचत जनजागृती, 'आपले सरकार सेवा केंद्र व तलाठी कार्यालयांचे लोकेशन गुगल नकाशावर निश्चित करणे यांचा समावेश आहे. २ ऑक्टोबर रोजी समारोप होणार विन आहे, या उपक्रमात ग्रामपंचायत प्रतिनिधी, महसूल अधिकारी, पोलीस पाटील, ग्रामस्थांचा सहभाग अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment