कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
धुमडेवाडी (ता. चंदगड) येथे विश्व हिंदू परिषद इचलकरंजी व सर्व संप्रदाय चंदगड यांच्यावतीने धर्मप्रसार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.३० पर्यंत ज्योतिर्लिंग मंदिर शिवतीर्थ धुमडेवाडी फाटा येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून हभप. देवव्रत वास्कर महाराज पंढरपूर हे आहेत. या शिवाय प्राणलिंग स्वामी मठाधिपती निपाणी, भगवान गिरी महाराज नूल, आनंद गजगेश्वर (कलावती देवी संप्रदाय), मयुरीजोगत मुतकेकर (देवदासी यल्लमा) अशोक मटकर (कानूर), तुकाराम कांबळे (माडवळे) यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन ह भ प विश्वनाथ पाटील (जट्टेवाडी), किशोरजी चव्हाण (प्रांत मंत्री), धनाजी शिंदे (प्रांत मंदिर अर्चक पुरोहित संपर्कप्रमुख), मृणालिनी पडवळ +प्रांत धर्म प्रसारक), शिवप्रसाद व्यास (विभाग मंत्री), कृष्णात गोंदूकुपे (जिल्हाध्यक्ष), सुजित कांबळे (जिल्हा मंत्री), प्रवीण सामंत (जिल्हा सहमंत्री) गणेश कांदेकर (जिल्हा धर्म प्रसारक) यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment