कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड यांच्या सहकार्याने कुदनूर (ता. चंदगड) येथे श्री गणेशा आरोग्याचा अभियान अंतर्गत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. गणेशोत्सवाचे औचित्य साधून कुदनूर येथील मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ लक्ष्मी मंदिर येथे पार पडलेल्या शिबिरास रुग्णांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
जनाई हॉस्पिटल गडहिंग्लज चे डॉक्टर चव्हाण यांनी आलेल्या रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली. शिबिरातील सर्व रुग्णांना मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले. यावेळी रुग्णांची बीपी, शुगर, व ECG तपासण्या बरोबरच ज्या नागरिकांची आभा कार्ड, गोल्डन कार्ड नाहीत त्यांची कार्ड काढण्यात आली. वैद्यकीय अधिकारी यांनी अवयव दान जनजागृती अंतर्गत मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य सेविका श्रीमती एस. आर. निर्मळकर, गटप्रवर्तक वंदना वांद्रे, आरोग्य सेवक मुरली शिंत्रे, अवधूत पाटील गावातील सर्व आशासेविका यांनी परिश्रम घेतले. मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले. याकामी कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वैभव नांगरे यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment