लकीकट्टे येथील अशोक खराडे, बाजीराव खराडे यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

06 September 2025

लकीकट्टे येथील अशोक खराडे, बाजीराव खराडे यांना मातृशोक

सुशीला रामचंद्र खराडे

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा 

     लकीकट्टे (ता. चंदगड)  येथील सुशीला रामचंद्र खराडे (वय 85) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी ( दि. 6) निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे. शनिवारी (दि. 6) सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. 8) सकाळी नऊ वाजता होणार आहे. सुशीला या सामाजिक कार्यातही अग्रेसर होत्या. कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक (केडीसीसी) चे निवृत्त विभागीय अधिकारी (डी.ओ.) अशोक खराडे यांच्यासह नागणवाडी येथील दत्तगुरु पेट्रोल पंपाचे मॅनेजर, गावातील चाळोबा सहकारी दूध संस्थेचे चेअरमन व गावातील मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेचे संचालक बाजीराव खराडे यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment