![]() |
मांडेदुर्ग : पन्हाळी तलावाजवळ विसर्जनच्या आधी गल्लीतील सर्व गणरायांचे एकत्रित पूजन करताना गणेशभक्त. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... एक दोन तीन चार.. गणपतीचा जयजयकार... गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला... असा गणरायाचा जल्लोष करत
चंदगड तालुक्यात शनिवारी (दि. 6 सप्टेंबर) घरगुती गणरायाचे मोठ्या भक्तीभावाने अकराव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. वेगवेगळ्या गावांमध्ये आपल्या गावाजवळील नदी, जलाशय, तलाव तसेच विहीर आदी ठिकाणी गणरायाचे विसर्जन केले. यादरम्यान काही ठिकाणी ग्रामपंचायत च्या पुढाकाराने जलकुंडही तयार करण्यात आले. यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
तालुक्यात मांडेदुर्ग, डोलगरवाडी, मजरे कारवे, मौजे कारवे, माणगाव, सुंडी, करेकुंडी यासह चंदगड व कोवाड परिसरातील अनेक गावांमध्ये अकरा दिवस गणेशाची विशेष आराधना करण्यात आली होती, पण गणरायाला निरोप देताना गणेशभक्त भावूक झाले होते.
काही गणेशभक्तानी ट्रॅक्टर मधून एकत्र जात तर काही ठिकाणी पायी चालत तर काही ठिकाणी आपल्या दुचाकी, चारचाकी मधून गणरायाला घेऊन जात विसर्जन केले.
No comments:
Post a Comment