![]() |
| नागनवाडी आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे ६ वी नॉर्मल डिलिव्हरी केल्यानंतर नवजात बाळाला घेऊन उभ्या असलेल्या डॉ. ऋतुजा, सोबत माता व आशा स्वयंसेविका |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
कोणत्याही (शक्यतो खाजगी) हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी साठी गेलेल्या महिलांचे सिझेरियन ऑपरेशन करून डिलिव्हरी करण्याची वैद्यकीय अधिकारी व स्टाफ ची घाई गडबड सुरू असते. किंबहुना सध्याच्या काळात नॉर्मल डिलिव्हरी बाळंतपण होणे दुरापास्त झाले आहे. अशा काळात कोणत्याही जास्त सोयी सुविधा नसताना उपलब्ध सुविधांनिशी नागणवाडी सारख्या छोट्या उपकेंद्रात सलग सहा नॉर्मल डिलिव्हरी बाळंतपणे करून येथील डॉक्टर व स्टाफने आपले वेगळेपण दाखवून दिले आहे.
सध्या ऐन गणेशोत्सवात नॅशनल हेल्थ मिशनच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असताना केवळ पेशंटची हेळसांड होऊ नये या माणुसकीच्या भावनेतून नागनवाडी ता. चंदगड येथील आयुष्यमान आरोग्यमंदिरच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋतुजा पवार यांनी स्वतः संपावर असतानाही डिलिव्हरी पेशंटला दाखल करून घेतले. एवढेच नव्हे तर महिलेची नॉर्मल डिलिव्हरी (बाळंतपण) केली. या आरोग्य मंदिर मध्ये डॉक्टर ऋतुजा यांनी गेल्या काही दिवसात केलेली ही ६ वी नॉर्मल डिलिव्हरी आहे. याबद्दल पेशंट व त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या कामी डॉ. ऋतुजा पोवार (समुदाय आरोग्य अधिकारी) यांना परिचारिका उषा गावडे, आशा सेविका वर्षा धोनुक्षे व दिपाली धाटोंबे यांची मदत तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ, कानूर खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर पाटील ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

No comments:
Post a Comment