नागनवाडी : सी एल वृत्तसेवा
सातवणे, कानडी, पोवाचीवाडी वाळकुळी गंधर्वगड परिसरात सार्वजनिक व घरगुती गणपतींना घटप्रभा कानडी बंधार्यावर भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
कानडी बंधार्यावरती मोठ्या भक्तीभावाने अकराव्या दिवशी गणरायाचे सार्वजनिक मंडळासह घरगुती गणपतीचे विसर्जनाला गर्दी झाली होती परिसरातील सातवणे, कानडी, पोवाचीवाडी, वाळकुळी, गंधर्वगड या गावांमध्ये सार्वजनिक मंडळाचे घरगुती गणपतीची ११ दिवस विशेष आराधना करण्यात आली होती. आज बाप्पाला निरोप देताना जड अंतकरणाने अनेक गणेश भक्त भावुक झाले होते.
ट्रॅक्टरला सजवून गणपतीची वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले. सातवणेत सार्वजनिक व घरगुती बाप्पा च्या मिरवणुकीला दुपारी एक पासून सुरुवात झाली. भक्तिमय वातावरणात ढोल ताशाच्या गजरात लेझीम भजनी मंडळ झिम्मा फुगडी यासारख्या परंपरागत वातावरणामुळे जोरदार मिरवणूक संध्याकाळपर्यंत काढण्यात आली. संध्याकाळी कानडी बंधाऱ्याकडे गणपती बाप्पा विसर्जनाला मार्गस्थ झाले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर अशा घोषणा देत जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देण्यात आला. यामध्ये लहानथोर मंडळी सह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
No comments:
Post a Comment