ओलम (हेमरस) मार्फत उन्नती ऊस पिक वाढ अंतर्गत शेतकरी मेळावा संपन्न, ओलमच्या यशात शेतकरी, तोडणी- वाहतूकदार आणि कर्मचारी यांचे मोलाचे योगदान - बिझनेस हेड तिरुमलाचारी कन्नम - चंदगड लाईव्ह न्युज

27 September 2025

ओलम (हेमरस) मार्फत उन्नती ऊस पिक वाढ अंतर्गत शेतकरी मेळावा संपन्न, ओलमच्या यशात शेतकरी, तोडणी- वाहतूकदार आणि कर्मचारी यांचे मोलाचे योगदान - बिझनेस हेड तिरुमलाचारी कन्नम

प्रतिदिन साडे सहा हजार मे. टन प्रमाणे यंदा आठ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट - युनिट हेड संतोष देसाई

तिरुमलाचारी कन्नम,बिझनेस हेड ओलम ऍग्रो

संजय पाटील / कोवाड, सी. एल. वृत्तसेवा

        ओलम (हेमरस) साखर कारखाना चनेहट्टी - राजगोळी खुर्द ता.चंदगड मार्फत कोवाड मध्ये उन्नती ऊस पिक वाढ अंतर्गत शेतकरी मेळावा नूतन बिझनेस हेड तिरुमलाचारी कन्नम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.प्रमुख पाहुणे म्हणून चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण तसेच प्रमुख वक्ते म्हणून मध्य व उत्तर भारत चे विभागप्रमुख कृषी विद्याविता अरुण देशमुख आणि कृषि विज्ञान केंद्र कालवडे चे माजी वरिष्ट शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. निलेश मालेकर होते.

संतोष देसाई युनिट हेड ओलम ऍग्रो
        प्रथमतः प्रास्ताविक केन हेड संग्राम पाटील यांनी केले. ऊस उत्पादकांना ऊस उत्पादनात वाढ करण्याबाबत माहिती  देताना ते म्हणाले ओलम कडून मागील वर्षी अनेक ऊस रोपवाटिके मधून  उपलब्ध केलेले जवळपास ४५ लाख उच्च प्रतीचे पायाभूत बियाणांची रोप पुरविण्यात प्रशासन यशस्वी झाले असून यंदा ९० लाख रोपांचा पुरवठा करण्यावर भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना ऊसावर पडलेला तांबेरा व मावा या रोगांच्या निवारणासाठी फवारणीसाठी ड्रोनच्या सहायाने मदत केली जात आहे. भविष्यात माती परिक्षणावर काम केले जाणार असून जमिनीची सुपीकता टिकविण्याचे मुख्य उदिष्ट असणार आहे.

उपस्थित सभासद व शेतकरी.

     बिझनेस हेड तिरूमलाचारी कन्नन यांचा शेतकऱ्याकडून सत्कार करण्यात आल. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले.आम्ही शेतकऱ्यांना आम्ही राजा मानतो.ओलमच्या यशात शेतकरी,तोडणी- वाहतूकदार आणि कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले असून यापुढील काळात देखील ओलम प्रशासन शेतकऱ्यांच्या सुख - दुःखात कायमच सहभागी राहील.कारखान्यामार्फत पुरविण्यात येत असलेल्या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी आपले ऊस उत्पादन वाढवून आपली प्रगती साधावी.जेणे करून दोन लाख मे.टन गाळप वरून सुरू झालेल्या कारखान्याचा भविष्यात १० लाख मे टन गाळप करण्याचा मानस असेल.कारखान्याची देखभाल दुरुस्तीची कामे प्रगती पथावर असून पुढील महिन्याच्या १५ ऑक्टोबर या तारखेनंतर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अरुण देशमुख उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना

      प्रमुख उपस्थिती वरून बोलताना युनिट हेड संतोष देसाई म्हणाले .सर्व शेतकऱ्यांनी शेतीची माती परीक्षण करून घ्यावी.शेती अधिकारी यांचेशी याबाबत संपर्क साधण्याचे यांनी आवाहन केले. कारखाना म्हणजे एक मंदीर आहे . शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून उत्पादन वाढ कसे होईल याकडे लक्ष द्यावे . येत्या गळित हंगामात प्रतिदिन सहा हजार पाचशे मे टना प्रमाणे अंदाजे आठ लाख मे टन गाळपाचे उद्दीष्ट आहे.

डॉ  नीलेश मालेकर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना

        ठिबक सिंचन व AI तंत्रज्ञान या विषयावर शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्याना उत्पादन वाढीविषयी माहिती देताना अरुण देशमुख म्हणाले, जमीन म्हणजे आई आहे जेवढी जमीनीची सुपीकता तितकी उत्पादकता जास्त.

        जसं बियाणे वापराल तसं उत्पादन रोप तयार करताना चांगले बेणं वापरा म्हणजे ऊस उत्पादन वाढेल. ऊसाची जाडी वाढवायची झाली तर दोन्ही  सरीतील अंतर हे चार फूट आणि दोन्ही रोपांतील अंतर दोन फूट असणे गरजेचे आहे जेवढे रोपांची संख्या कमी तितका जास्त फुटवा येऊन ऊसाची तेवढी जाडी आणि वजन जास्त वाढते."शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी " असा दाखला देत शेतकऱ्यांना प्लॉट वरून आणलेल्या वेगवेगळ्या उसाची वजने घेऊन ऊसाचे वजन वाढविण्याचे कौशल्य आत्मसात करण्याबाबत मार्गदर्शन केले.आणि त्यांना उद्भवत असलेल्या अनेक समस्यांचे निराकरण कसे करावे याचे मार्गदशन केले. पूर्वापार चालत आलेल्या सरीन पाणी देण्याच्या पद्धतीला फाटा देत

        ठिबक सिंचन ही पाण्याची बचत करणारी आधुनिक सिंचन पद्धत वापरात आणावी  ज्यामध्ये झाडांच्या मुळांजवळ थेंब-थेंब किंवा सूक्ष्म धारेने पाणी दिले जाते, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येतो आणि उत्पादन वाढते. ही पद्धत विशेषतः पारंपरिक पद्धतींपेक्षा २५ ते ६०% पाणी वाचवते. या प्रणालीमध्ये पाणी थेट मुळाच्या भागात पोच होत असल्याने आणि पाण्यावर खते देण्याच्या पद्धतीच फर्टीगेशन असे संबोधले  जाते.यात पाणी.ऊर्जा आणि खतांची बचत झाल्यामुळे शेतकऱ्यांचा एकूण खर्च कमी होतो. पाणी आणि पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळाल्याने पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादनातही ३० टक्क्यांपर्यंत वाढ होते. यावेळी त्यांनी शेती मध्ये देखील AI तंत्रद्नानाचा वापर प्रभावीपणे करण्यावर भर देण्याबाबत मार्गदर्शन केले.

    कृषि विज्ञान केंद्र कालवडे चे माजी वरिष्ट शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.निलेश मालेकर यांनी जमिनीचे आरोग्य व ऊस उत्पादन वाढ या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना सांगितले की.शेत जमिनीतील मातीचे जैविक, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म चांगले असणे समाविष्ट असते, ज्यामुळे पिकांचे पोषण होते, पाणी व हवा स्वच्छ राहते आणि पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. पर्यायी उत्पादनात वाढ होते.यावेळी ऊसाचे बेणे निवडताना कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करताना ते म्हणाले की ऊसाचे चांगले बेणे निवडणे ही उत्तम उत्पादन मिळवण्यासाठी आवश्यक बाब आहे. बेणे निवडताना ते सुधारित जातीचे, जाड, रसरशीत, निरोगी असावे आणि त्याचे वय ९ ते ११ महिने असावे. बेणे मळ्यातीलच ऊसाचे बेणे वापरावे आणि लागवडीपूर्वी बेण्यावर रासायनिक व जैविक प्रक्रिया करावी, ज्यामुळे कीड आणि रोगांपासून संरक्षण मिळेल व उगवण चांगली होईल.  

    जमिनीतील कर्ब नत्राचे प्रमाण व जमिनीतील जिवाणू हा घटक देखील तितकाच महत्वाचा मानला जातो. 

    ऊस पुरवठा व एच अँड टी मॅनेजर अनिल पाटील यांनी आभार मानत यावेळी सांगितले की यंदाच्या हंगामात आठ लाख मे .टन गाळपाचे उद्दिष्ट व्यवस्थापनाने ठेवले आहे .शेतकऱ्यांना चांगल्यात चांगला दर देण्यावर प्रशासनाचा भर राहील. आठलाख मे.टनाचे उद्दीष्ट पूर्ण झाल्यास इतर कारखान्यापेक्षा ही जादा दर देवू त्यासाठी शेतकरी व ऊस पुरवठा.तोडणी वाहतूकदार यांनी ओलम कारखान्याला जास्तीत जास्त उस पुरवठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे

    डेप्युटी मॅनेजर ऊस विकास - नामदेव पाटील यांनी यावेळी सांगितले शेती विभागाचे कर्मचारी आतापासूनच शेतकऱ्यांच्या संपर्कात असून त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच फोन वरून सुधारित जातीची अन् जास्त उत्पादन देणारी ऊस रोपे बुकिंग करण्याचे काम चालू आहे.त्यासाठी अनेक ऊस रोपवाटिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या कडून दर्जेदार ऊस रोपांची उपलब्धता कशी करता येईल यासाठी ऊस विभाग कार्यरत आहे.

    यावेळी एच आर मॅनेजर - महेश भोसले, फायनान्स हेड - सुभाष डोरा, प्रोसेस हेड - अनिल खरे, इलेक्ट्रिकल हेड - बाहुबली बेलवी, इन्स्ट्रुमेंट हेड - सरनाप्पा,  अनिल पाटील,  व रणजित सरदेसाई, असि. मॅनेजर - भागोजी लांडे, केन ऑफिसर, विलास शिंदोळकर, राजू सुतार, उत्तम कदम, संजय पाटील, जगदीप पाटील, परशराम पाटील, मोहन नुलेकर, मंजुनाथ कोरी, फत्तेसींग सरदेसाई, सर्व फील्ड ऑफिसर,

     क्लार्क त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी - प्रमिला पाटील- निटटूर, वसंत पाटील, सुनील पाटील - माणगांव, तानाजी आढाव, अप्पा वांद्रे, मारुती भोगन - कोवाड, गणपती दळवी, सुधाकर देशपांडे, अनिल पाटील, तानाजी पाटील, भरमु गुरव, अप्पा शिखरे - शिप्पूर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment