चंदगड तालुक्यातील सर्वात वयस्कर प्राथमिक शिक्षक द. ता. पाटील गुरुजी यांचे निट्टूर येथे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

27 September 2025

चंदगड तालुक्यातील सर्वात वयस्कर प्राथमिक शिक्षक द. ता. पाटील गुरुजी यांचे निट्टूर येथे निधन

दत्तात्रय तानाजी पाटील

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

   निट्टूर (ता. चंदगड) येथील जुन्या काळातील शिक्षक दत्तात्रय तानाजी पाटील (द. ता. पाटील) गुरुजी, वय ९६ वर्षे यांचे शनिवार दि. २७/०९/२०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. सद्यःस्थितीत चंदगड तालुक्यातील ते सर्वात वयस्कर प्राथमिक शिक्षक होते.

   गुरुजीनी १९५९ -१९८६ पर्यंत प्राथमिक शिक्षक म्हणून अध्यापन केले होते. त्यांच्या सेवानिवृत्तीला यावर्षी ४० वर्षे पूर्ण झाली होती. शांत स्वभावाचे निस्वार्थी व त्या काळातील विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जाणारे ते व्यक्तिमत्त्व होते. आज काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या पच्छात मुलगा रमेश दत्तात्रय पाटील, मुलगी श्रीमती मालन धबाले राजगोळी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment