रंगांची जादू – दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगडची तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत उंच भरारी, स्पर्धा एक बक्षिसे तीन न्यू इंग्लिश स्कूलचा नवा विक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

21 September 2025

रंगांची जादू – दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगडची तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत उंच भरारी, स्पर्धा एक बक्षिसे तीन न्यू इंग्लिश स्कूलचा नवा विक्रम

 


चंदगड : सी एल वृतसेवा

प्रा. नामदेवराव दुंडगेकर सरांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित चंदगड तालुकास्तरीय भव्य चित्रकला स्पर्धेत दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगडच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकौशल्याने सर्वांना चकित करत घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धेत लहान गटात कु. मंजिरी सदानंद शिंदे हिने चतुर्थ क्रमांक, तर वरिष्ठ गटात कु. साक्षी संदीप गावडे हिने प्रथम क्रमांक, तसेच कु. निधी दिपक पाटील हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावून विद्यालयाचा नावलौकिक वाढविला.

एकाच स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावल्याने विद्यालयात आनंदाचे वातावरण असून हा यशाचा बहुमोल ठेवा शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उंचीचे प्रतिक मानला जात आहे.

या यशाबद्दल दि न्यू इंग्लिश स्कूलच्या शालेय समितीचे चेअरमन प्रा. एन. एस. पाटील सर, प्राचार्य आर. पी. पाटील, उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामागे कला शिक्षक व्ही. के. गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.

शाळेच्या प्रांगणात या यशाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले असून, "विद्यार्थ्यांचा रंगांनी सजलेला हा विजय आगामी स्पर्धांसाठी प्रेरणादायी ठरेल" अशी भावना व्यक्त करण्यात आली.

No comments:

Post a Comment