कोवाड : सी एल वृत्तसेवा
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय (माउंट अबू राजस्थान) च्या कोवाड शाखेच्या वतीने रविवार दि. ७/९/२०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोवाड, ता. चंदगड येथील श्री मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता सुनंदा बहनजी (क्षेत्रीय संचालिका, पुणे विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम मुख्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख वक्त्या, हुपरी सेवा केंद्राच्या संचालिका सुनिता दीदी 'शिक्षक : स्वर्णीम युगाचा शिल्पकार' या विषयावर व्याख्यान देणार आहेत. यावेळी श्रीमती स्मिता गौड (सहाय्यक शिक्षण संचालक कोल्हापूर) व डॉ. रमेश व्हसकोटी (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) कोल्हापूर) उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा तसेच समर्पित बहिणींचा सन्मान केला जाणार आहे. तत्पूर्वी सकाळी साडेनऊ वाजता ब्रह्माकुमारी सेंटर रणजीत नगर कोवाड येथून शोभायात्रा निघणार आहे. कार्यक्रमानंतर ब्रह्मा कुमारी सेंटरच्यावतीने ब्रह्मा भोजनची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमास शिक्षक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन कोवाड सेंटरच्या संचालिका ब्रह्माकुमारी मनीषा बहनजी यांयनी केले आहे.
No comments:
Post a Comment