सेक्रेटरी पदी डॉ. संजय तळगुळकर व खजिनदारपदी डॉ. विजय कडोलकर यांची बिनविरोध निवड
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कार्वे (ता. चंदगड) येथील चंदगड तालुका डायग्नोस्टिक सेंटरची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी डॉ. संजय मुरकुटे तर उपाध्यक्षपदी डॉ. अजयकुमार दळवी यांची, तसेच सेक्रेटरीपदी डॉ. संजय तळगुळकर व खजिनदारपदी डॉ. विजय कडोलकर यांची निवड झाली.
अध्यक्षपदासाठी डॉ. संजय मुरकुटे यांचे नाव डॉ. मिलिंद पाटील यांनी सुचवले. तर उपाध्यक्षपदासाठी डॉ. अजयकुमार दळवी यांचे नाव डॉ. एन. टी. मुरकुटे यांनी सुचवले. अन्य कार्यकारीणीमध्ये डॉ. रवी पाटील, डॉ. किरण पाटील, डॉ. चंद्रकांत शिंदे, डॉ. सागर तेजम, डॉ. मिलिंद पाटील, डॉ. निवृत्ती गुरव, डॉ. विजय कडोलकर, डॉ. प्रशांत कदम, डॉ. एन. टी. मुरकुटे आणि डॉ. दयानंद पाटील यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment