![]() |
दयानंद वसंत पाटील |
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील प्रतिथयश LIC चे विमा सल्लागार दयानंद वसंत पाटील यांना MDRT (USA) 2026 चा बहुमान मिळाला. त्यामुळे त्यांना दि. 07 ते 10 जुन 2026 रोजी अमेरिकेतील, कॅलिफोर्निया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. अमेरिकेच्या परिषदेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणारे चंदगड, आजरा, गडहिंग्लज व बेळगाव सीमाभागातील ते एकमेव विमा सल्लागार आहेत.
द मिलियन डॉलर राउंड टेबल (MDRT) ही एक जागतिक आणि स्वतंत्र संघटना आहे. जी जीवन विमा आणि वित्तीय सेवा उद्योगातील सर्वोत्तम विक्री व्यवसायिकांचे प्रतिनिधित्व करते. गेली 22 वर्ष ते विमा व्यवसायामध्ये काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी 2 वेळा COT (एका वर्षात 3 वेळा MDRT) व 15 वेळा MDRT चा बहुमान मिळवला आहे. हा बहुमान मिळवणारे चंदगड, आजरा, गडहिंग्लज व बेळगाव सीमा भागातील ते एकमेव विमा सल्लागार आहेत.
ग्रामीण भागामध्ये विम्याचा व्यवसाय करणे तसे आव्हानात्मक असते. परंतु त्यांनी ग्रामीण भागात विम्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कोवाड व बेळगाव येथे सुसज्ज ऑफिस व प्रशिक्षित स्टाफ तयार केला आहे.
उत्कृष्ट सेवा व सल्ला देण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. या कामी त्यांना वरिष्ठ शाखाधिकारी अतुल कदम, सनंदन गायकवाड, किरण अवचिते व विकास अधिकारी अरुण उबाळे यांचे मार्गदर्शन व ग्राहकांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment