किटवाड अमर विकास सेवा संस्थेची ६५ वी वार्षिक सर्व साधारण सभा उत्साहात, ४,९७,९११ रुपये नफा - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2025

किटवाड अमर विकास सेवा संस्थेची ६५ वी वार्षिक सर्व साधारण सभा उत्साहात, ४,९७,९११ रुपये नफा

 

सर्वसाधारण सभेत बोलताना कालकुंद्री सेवा संस्थेचे सचिव श्रीकांत कदम

कुदनूर : सी एल वृत्तसेवा

       किटवाड (ता. चंदगड) येथील श्री अमर विकास सेवा संस्थेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ब्रह्मलिंग दूध संस्था सभागृहात नुकतीच संपन्न झाली. अध्यक्ष स्थानी चेअरमन परसू पाटील होते. सचिव मल्लाप्पा नांदवडेकर यांनी अहवाल वाचन केले. त्यांनी संस्थेला ब वर्ग मिळाला असून अहवाल सालात ४ लाख ९७ हजार ९११ रुपये इतका नफा झाल्याचे सांगितले. नफ्यातून सभासदांना ६ टक्के लाभांश देण्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी मारुती हेब्बाळकर, भरमा ओऊळकर, परसू रायान्नाचे, सदानंद हेब्बाळकर, अरूण पाटील, अरुण तेऊरवाडकर, प्रकाश पाटील, वैजनाथ वर्पे, सुगंधा कालकुंद्रीकर, शोभा पाटील, श्रीकांत कदम आदींसह सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक सट्टूपा पाटील यांनी केले. कृष्णा नांदवडेकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment