हलकर्णी महाविद्यालयात मुल्यसंवर्धन प्रशिक्षण संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2025

हलकर्णी महाविद्यालयात मुल्यसंवर्धन प्रशिक्षण संपन्न

 


चंदगड / प्रतिनिधी 

     हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात दाटे केद्रातंर्गत शिक्षकांचे 'मूल्यसंवर्धन' प्रशिक्षण शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव माईनकर यांचे उपस्थित दिनांक -23 सप्टेंबर 2025 ते 26 सप्टेंबर 2025 ह्या कालावधीत विविध नाविन्यपूर्ण घटक व मार्गदर्शनाने संपन्न झाले. सदर प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून विजय कांबळे,दिनकर तावडे, जयवंत पाटील, यशवंतराव महाविद्यालयाचे प्राचार्य बी. डी. आजळकर यांनी विद्यार्थ्यांमधील मूल्यांचे संवर्धन करणेसाठी कोणत्या नकारार्थी बाबी टाळाव्यात व कोणत्या सकारार्थी बाबी विद्यार्थ्यांसमोर ठेवाव्यात या बाबत सखोल मार्गदर्शन केले.शिक्षकांचे विविध गट पाडून त्यांना मूल्यवर्धन च्या अनुषंगाने घटक देवून सादरीकरण करुन घेणेत आले.यांमध्ये ताणतणाव, आनंददायी जीवन, संस्कारक्षम उपक्रम, प्रामाणिक पणाचे फळ, पाणी म्हणजे जीवन, जीवनात योगाचे महत्त्व, आई-वडील मोलाचे- अशा संस्कारक्षम घटकांच्या अनुषंगाने सर्वांच्या सहयोगाने 'मूल्यवर्धन' कसे जपायचे याची चर्चा व एल. सी. डी. प्रोजेक्टर च्या माध्यमाने सादरीकरण करुन शिक्षकांना प्रेरित करणेत आले.सदर प्रशिक्षण मध्ये देवदास भालबर, ज्योती बामणे, स्वाती जोशी, कल्पना पाटील, रिना गावकर, युवराज कागणकर, अशोक भोईटे, दयानंद पाटील, मनिषा गावडे, वैशाली भोईटे, गोपाळ डुरे, जयवंत पाटील या शिक्षकांसह सर्वांनी सक्रिय सहभाग व सादरीकरण करुन प्रशिक्षणची रंगत वाढवली. सांगता कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात उज्वल यश मिळवलेबद्दल कलिवडे शाळेचे मुख्याध्यापक तथा उपक्रमशील शिक्षक मलिक शेख व  कन्येच्या एम.बी.बी.एस.प्रवेशाबद्दल बेळेभाट शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका डॉ .बलांडे, जंगमहट्टी शाळेचे मुख्याध्यापक श्री गायकवाड यांचे शाल व पुष्प देवून अभिनंदन करणेत आले.यावेळी चंदगड बी.आर.सी.तज्ज्ञ सुनिल पाटील व इतर मान्यवरांनी भेट देवून प्रशिक्षण बद्दल समाधान व्यक्त केले.केंद्र नियंत्रक म्हणून नागनवाडी केंद्रप्रमुख संजय घोळसे , हलकर्णी केंद्रप्रमुख अर्जुन चाळूचे यांनी कामकाज पाहिले.यावेळी दाटे केंद्रप्रमुख विश्वनाथ गावडे यांचेसह तीन केंद्रातील  पन्नास शिक्षक उपस्थित होते.सदर प्रशिक्षण चंदगड पंचायत समिती चे शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सुभेदार,सुनित चंद्रमणी, नामदेव माईनकर व गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांचे मार्गदर्शन खाली सुयोग्य नियोजन खाली संपन्न झाले.सुत्रसंचालन बाबुराव वरपे यांनी तर आभार सरीता इंगळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment