बाबुराव वरपे 'शिक्षक रत्न'पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

12 October 2025

बाबुराव वरपे 'शिक्षक रत्न'पुरस्काराने सन्मानित

  

बाबुराव वरपे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     मुंबई येथील सत्यमेव सेवा फौंडेशन मार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय 'शिक्षक रत्न' २०२५  पुरस्कार   रामपुर (ता. चंदगड) चे  सुपुत्र व विद्या मंदिर बेरड वाडा शाळेचे उपक्रमशिल मुख्याध्यापक  बाबुराव वरपे याना जाहीर झाला आहे. 

          श्री वरपे आपल्या ३२ वर्षे सेवा काळात गरीब, गरजू विद्यार्थी व भटक्या वंचित समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. वि. मं. येणेचवंडी, जट्टेवाडी ह्या शाळांना आदर्श शाळा व गुणवत्ता विकास कार्यक्रमात जिल्हास्तर व राज्यस्तरावर विविध पुरस्कार मिळवणेत मोलाचे योगदान दिले आहे. वि. मं. बेरडवाडा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्य, स्पोर्ट्स किट, स्वेटर, गणवेश, १००% साक्षरता कार्यक्रम यांसाठी भरीव आर्थिक योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेवून जि. प. कोल्हापूर कडील आदर्श शिक्षक पुरस्कार सह शासनाचे व विविध सेवाभावी संस्थांचे २५ पेक्षा अधिक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अशा शिक्षण क्षेत्रासाठी व समाजाच्या विकासासाठी सदैव भरीव योगदान देणाऱ्या शिक्षकाला यावर्षीचा प्रतिष्ठेचा सत्यमेव सेवा फौंडेशनचा राज्यस्तरीय 'शिक्षक रत्न 'पुरस्कार मिळालेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

No comments:

Post a Comment