चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही - चंदगड लाईव्ह न्युज

10 November 2025

चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

  

संपत पाटील, चंदगड : सी एल वृत्तसेवा

         चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी दिनांक १० रोजी पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल झाला नाही निवडणूक विभागातर्फे चंदगड तहसील कार्यालय येथे निवडणूक यंत्रणा कार्यरत आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी शेख यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

    प्रभागानुसार या ठिकाणी ५ टेबल मांडण्यात आले आहेत यानुसार नगरसेवक व नगराध्यक्ष यासाठी स्वतंत्र अर्ज दाखल करून घेण्यात येत आहेत. दि. १० ते १७ नोव्हेंबर या दरम्यान अर्ज दाखल होणार आहे तर १८ रोजी छाननी होणार आहे. यादरम्यान सोमवारी माजी आमदार राजेश पाटील व दिवंगत माजी मंत्री बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदाताई बाभुळकर या एकत्र आल्याची घोषणा सोमवारी झाली. यानंतर आता मंगळवारपासून आणखी हालचाली गतिमान होणार आहेत. यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी ही गर्दी होईल असे चित्र आहे.

No comments:

Post a Comment