संपत पाटील, चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीची रंगत अर्ज छाननी व माघारी पूर्वीच शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादीचे शरद पवार व अजित पवार असे दोन्ही गट, राष्ट्रीय काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना व मित्र पक्षांच्या राजश्री शाहू विकास आघाडीत अटीतटीची निवडणूक लढत होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही आघाड्यांनी उमेदवारी अर्ज छाननी व माघारी पूर्वीच आपले पॅनल निश्चित केले. सोमवार दि. १७ रोजी आपापले पॅनेल जाहीर करून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. निवडणुकीत तिसरे पॅनेल हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे असून त्यांच्या पॅनलची अधिकृत घोषणा झाली असून त्यांनीही आपले उमेदवार जाहीर केले आहे आहे.
जाहीर झालेल्या दोन्ही पॅनेल व त्यांच्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे राजर्षी शाहू विकास आघाडी नगराध्यक्ष दयानंद सुधाकर काणेकर व नगरसेवक पदाचे उमेदवार अनुक्रमे वार्डनिहाय १ ते १७ पुढील प्रमाणे
१) सौ. सुधा शांताराम गुरबे, २) सुधीर रामचंद्र पिळणकर, ३) फिरोज अब्दुल रशीद मुल्ला, ४) सौ. रिझवाना सलाउद्दीन नाईकवाडी, ५) सिकंदर मुश्ताक नाईक, ६) नवीद अब्दुलमजीद अत्तार, ७) प्रमोद विनायक कांबळे, ८) सौ. जयश्री संतोष वनकुद्रे, ९) सुनीता नारायण चौकुळकर, १०) सौ. प्रियांका सतीश परीट, ११) सुभाष गोविंद गावडे, १२) सौ. सानिया जुबेर आगा, १३) सौ. इंदू संजय कुंभार, १४) सौ. प्रेरणा मनोज हळदणकर, १५) प्रसाद गणपती वाडकर, १६) सौ. शितल रामनाथ गुळामकर, १७) संतोष गणपती हाजगूळकर.
आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप पॅनलचे उमेदवार पुढील प्रमाणे नगराध्यक्ष पदासाठी सुनील सुभाष काणेकर
तर नगरसेवक पदासाठी वार्डनिहाय १७ उमेदवार पुढील प्रमाणे १) सौ. जयश्री रामा जुवेकर, २) चेतन व्यंकटेश शेरेगार, ३) अबुजर अब्दुलरहीम मदार, ४) सौ. आयेशा समीर नायकवाडी, ५) शकील काशीम नाईक, ६) तजमुल सलीम फनीबंद, ७) धीरज श्यामसुंदर पोशिरकर, ८) सौ. वैष्णवी सुनील सुतार, ९) सौ. शितल अनिल कट्टी, १०) सौ. माधवी उमेश शेलार, ११) सचिन निंगाप्पा नेसरीकर, १२) सौ. आसमा असिफ बेपारी, १३) सौ. सुचिता संतोष कुंभार, १४) सौ. गायत्री गुरुनाथ बल्लाळ, १५) संदीप गोपाळ कोकरेकर, १६) सौ. एकता श्रीधन दड्डीकर, १७) सचिन सुभाष सातवणेकर.
शिंदे गट शिवसेना प्रणीत आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे.......
नगराध्यक्ष पदासाठी तानाजी पांडुरंग देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब. नगरसेवक पदासाठी वार्डनिहाय उमेदवार पुढील प्रमाणे
१) पुनम प्रदीप कडते, २) तेजस मारुती गावडे, ३) बाळासाहेब उर्फ आनंद मारुती हळदणकर, ४) शहीदा शकिल नेसरीकर, ५) अब्दुलसत्तार महमदसाब नाईक, ६) शानूर महमदअली पाच्छापूरे, ७) सदानंद अशोक कांबळे, ८) आरती विठ्ठल गोंधळी, ९) जयश्री परशराम फाटक, १०) रिक्त, ११) रमेश चंद्रकांत देसाई, १२) रिक्त १३) रिक्त १४) स्नेहा महेश येडवे, १५) यशवंत धोंडिबा डेळेकर, १६) रिक्त, १७) गणेश रामचंद्र मुळीक.
हे उमेदवार एकमेकांविरुद्ध लढत देणार आहेत. निवडणुकीत आपला प्रतिस्पर्धी निश्चित झाल्याने प्रचाराची दिशा ठरवण्यावर भर दिला आहे.

No comments:
Post a Comment