ग्रामपंचायत कुदनूर येथे दि. २१ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2025

ग्रामपंचायत कुदनूर येथे दि. २१ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

  


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

   कुदनूर (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायत कुदनूर च्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ११ ते ४ या वेळेत होणाऱ्या आरोग्य शिबिरात रुग्णांची मोफत नेत्र तपासणी, अस्थिरोग (हाडांचे रोग) तपासणी, शुगर, बीपी तपासणी व आरोग्यविषयक सल्ला दिला जाणार आहे. यावेळी अस्थिरोग व मणक्याचे शस्त्रक्रिया तज्ञ श्री अर्थो अँड ट्रामा सेंटर बेळगावचे डॉ. देवेगौडा आय. उपस्थित राहून तपासणी व आरोग्यविषयक सल्ला देणार आहेत. या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच सौ संगीता घाटगे, डॉ. संदेश जाधव व ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment