नांदवडे येथील श्री भावेश्वरी विद्यालयात पालक शिक्षक विद्यार्थी संयुक्त मेळावा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2025

नांदवडे येथील श्री भावेश्वरी विद्यालयात पालक शिक्षक विद्यार्थी संयुक्त मेळावा संपन्न

पालक मेळाव्यात मार्गदर्शन करताना शालेय समिती चेअरमन रामाणा पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांबरोबर पालकांची भूमिका महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन शालेय समिती सदस्य व इंग्रजी विषयाचे ख्यातनाम अध्यापक सुधीर शिंदे यांनी केले. ते पालक शिक्षक विद्यार्थी संयुक्त मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शालेय समिती चेअरमन रामाणा पाटील होते. 

    इयत्ता आठवी एन. एम. एम. एस. परीक्षा, इयत्ता नववीची गुणवत्ता वाढ व इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा या दृष्टीने परीक्षा तयारी व गुणवत्ता वाढ यासाठी शिक्षक पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. विद्यालयाचे मुख्याध्यापक यु. एल. पवार यांनी वर्षभरातील गुणवत्ता वाढीसाठी तसेच एन एम एम एस परीक्षेसाठी घेतलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. 

        प्रास्ताविक सौ. एस. आर. कोरवी यांनी केले. आभार डी. जी. पाटील यांनी मानले. यावेळी अध्यापक पी. एम. कांबळे, महादेव नाईक, गोपाळ सुतार यांच्यासह पालक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment