![]() |
| संग्रहित छायाचित्र |
दुंडगे (ता. चंदगड) येथे काल मंगळवार दि. १८ रोजी दुपारी एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील १० जणांसह दोन बैल, दोन शेळ्या, गाय वासरू रेडकू अशा पाळीव प्राण्यांना चाऊन जखमी केले होते. या पिसाळलेल्या कुत्र्याची मोठी दहशत होती. बुधवारी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन सर्व ग्रामस्थ आपल्या दुंडगे या गावी परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास टाकला.
जखमी झालेल्या ग्रामस्थांवर गडहिंग्लज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या कामी उपसरपंच लक्ष्मण गणपती पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांना बाबू सुतार व प्रथमेश पाटील यांचे सहकार्य लाभले. तर जखमी झालेल्या पाळीव प्राण्यांवर कोवाड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले.

No comments:
Post a Comment