![]() |
| चंदगड सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांना निवेदन देताना शिवसैनिक |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
बेळगाव वेंगुर्ला मार्गावर मजरे कार्वे व नागनवाडी तसेच इतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांचे आपण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा दृश्यकृत करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करून विद्यार्थ्यांना भयमुक्त करावे. तसेच विद्यार्थ्यांच्यामध्ये असलेली भीती व त्यांच्या संरक्षणासाठी शाळेच्या वेळेत त्या-त्या मार्गावर पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी उबाठा शिवसेनेच्या वतीने चंदगड पोलीसाकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनावर उबाठा शिवसेना तालुका अध्यक्ष गणेश बागडी, शिव सहकार तालुका संघटक आनंद शिंदे, एकनाथ वाके, विभाग प्रमुख विठ्ठल कांबळे, सुशिल दळवी, सुभाष घुले, ग्राहक संरक्षण तालुकाप्रमुख चंद्रकांत गावडे, युवासैनिक गंगाराम कांबळे यांच्या सह्या आहेत.

No comments:
Post a Comment