कोनेवाडी शाळेची विद्यार्थिनी सुकन्या कडुकर गोळा फेक मुलींच्यामध्ये जिल्ह्यात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2025

कोनेवाडी शाळेची विद्यार्थिनी सुकन्या कडुकर गोळा फेक मुलींच्यामध्ये जिल्ह्यात प्रथम



चंदगड : दि. 19-12-2025

        कोनेवाडी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कुमारी सुकन्या धोंडीबा कडूकर हिने गोळा फेक मोठा गट मुली या वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या कार्यामुळे आई-वडिलांचे, शाळेचे, गावचे व तालुक्याचे नाव जिल्हा पटलावर उमटवले. तिला शिक्षक व आई-वडीलांचे मार्गदर्शन लाभले. या यशामुळे यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

No comments:

Post a Comment