चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत खेडूत शिक्षण मंडळ, चंदगड संचलित र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने ‘शाश्वत विकासासाठी युवक’ या संकल्पनेवर आधारित विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मंगळवार दि. ३० डिसेंबर २०२५ ते सोमवार दि. ५ जानेवारी २०२६ या कालावधीत मौ. दाटे ता. चंदगड, जि. कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.
शिबिराचे उद्घाटन समारंभ मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.उद्घाटक म्हणून जी. एस. पाटील (अध्यक्ष, खेडूत शिक्षण मंडळ, कालकुंद्री) उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी डॉ. एस. डी. गोरल (प्र. प्राचार्य, र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड) असणार आहेत.प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून विश्वास पाटील (पोलीस निरीक्षक, चंदगड), सुनील काणेकर (नगराध्यक्ष, नगरपंचायत चंदगड), लक्ष्मण गावडे (अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना) व नामदेव पाटील (उद्योजक, चंदगड) उपस्थित राहणार आहेत.
शिबिराच्या कालावधीत दररोज सायंकाळी विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. बुधवार दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ६.०० वाजता मा. डॉ. विश्वनाथ पाटील यांचे “अभ्यास विज्ञान आणि आजचा युवक” या विषयावर व्याख्यान. गुरुवार दि. १ जानेवारी २०२६ रोजी सायं. ६.०० वाजता सौ. गीता कुंभार यांचे “आजची स्त्री : अधिकार आणि कर्तव्य” या विषयावर मार्गदर्शन.अध्यक्षस्थानी सौ. भारती जाधव (महिला संघटिका, चंदगड विधानसभा) असणार आहेत.
शुक्रवार दि. २ जानेवारी २०२६ रोजी सायं. ६.०० वाजता संतोष कुटके (कृषी पर्यवेक्षक, कोल्हापूर) व जीवन पालमपल्ले (सहाय्यक कृषी अधिकारी, चंदगड) यांचे “शासकीय कृषी योजना व सुधारित शेती तंत्र” या विषयावर मार्गदर्शन. अध्यक्ष एल. डी. कांबळे (उपाध्यक्ष, खेडूत शिक्षण मंडळ).
शनिवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सायं. ६.०० वाजता अॅड. एन. एस. पाटील यांचे “कायदा आणि समाज” या विषयावर व्याख्यान. अध्यक्षस्थानी एम. एम. तुपारे (सचिव, खेडूत शिक्षण मंडळ) असणार आहेत. रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९.०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मा. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील (संचालक, खेडूत शिक्षण मंडळ) उपस्थित राहणार आहेत.
सोमवार दि. ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिवाजीराव पाटील, भरमूअण्णा पाटील, माजी आमदार राजेश पाटील उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी प्रा. आर. पी. पाटील (संचालक, खेडूत शिक्षण मंडळ) असणार आहेत.
शिबिरादरम्यान ग्रामस्वच्छता, श्रमदान, जलसंधारण, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती जनजागृती, आरोग्य जनजागृती, डिजिटल साक्षरता, पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. शिबिरात स्वयंसेवकांसाठी निश्चित दिनक्रमही ठरवण्यात आला आहे.
या शिबिराचे आयोजन एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एस. डी. गावडे, उपप्राचार्य प्रा. (डॉ.) एस. एम. माने, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवकांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. शिबिरास दाटे ग्रामपंचायत, विविध संस्था व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.
.png)
No comments:
Post a Comment