![]() |
| टी. व्ही. खंदाळे |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
क्रिडेला केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता शिस्त, परिश्रम, संघभावना आणि जीवनमूल्यांची जोड देणाऱ्या दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेज, चंदगड येथील क्रीडा शिक्षक मा. श्री. टी. व्ही. खंदाळे यांचा “उत्कृष्ट क्रीडा संयोजक” म्हणून झालेला सन्मान ही संपूर्ण शाळा, संस्था आणि चंदगड तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

टी. व्ही. खंदाळे यांना “उत्कृष्ट क्रीडा संयोजक” पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य आर. पी. पाटील, उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे, ग्रंथपाल शरद हदगल, जयसिंग पाटील व इतर शिक्षकांनी सत्कार केला.
क्रिडाशिक्षक श्री. खंदाळे हा सन्मान त्यांच्या अनेक वर्षांच्या निस्वार्थ सेवाभावाची, नियोजनबद्ध कार्यशैलीची आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची जणू पावतीच आहे. विद्यार्थ्यांना केवळ खेळ शिकवून थांबता न जाता, खेळातून जीवनघडण घडवण्याचे महत्त्व त्यांनी नेहमीच अधोरेखित केले. पराभवातही आत्मविश्वास राखण्याची ताकद आणि विजयात नम्रता जपण्याचे संस्कार देणारे खंदाळे सर हे खऱ्या अर्थाने क्रीडा संस्कारांचे शिल्पकार आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले असंख्य खेळाडू आज विविध स्तरांवर यश मिळवत असून, हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख मानली जात आहे. या गौरवासंबंधी शालेय समितीचे चेअरमन मा. अॅड. एन. एस. पाटील, प्राचार्य आर. पी. पाटील व उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी खंदाळे यांचे अभिनंदन केले. श्री. खंदाळे यांच्या या निवडीमुळे शाळेच्या व संस्थेच्या लौकिकात मोलाची भर पडली. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

.jpeg)
No comments:
Post a Comment