चंदगड : सी एल वृत्तसेवा
खेडूत शिक्षण मंडळाच्या वतीने खेडूत चषक वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यकम शनिवार दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे सचिव एम. एम. तुपारे यांनी स्पर्धेचे संयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी खेडूतचे अध्यक्ष जी. एस. पाटील राहतील.
खेडूतचे ऑडीटर प्रा. ॲड. एन. एस. पाटील व संचालक आर. पी. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर खेडूत शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, सचिव एम. एम. तुपारे, खजिनदार संचालक ए. व्ही. सुतार, संचालक आर. पी. पाटील, एम. बी. पाटील, एन. के. पाटील, एस. एम. फर्नाडीस, बी. बी. पाटील, आर. बी. पाटील, व्ही. डी. सडेकर, के. एस. माळवे, एस. व्ही. मुरकुटे, माजी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
गुरुवर्य म. भ. तुपारे गुरुजी यांच्या स्मरणार्थ सर्व चषक व माजी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्याकडून सर्व पुस्तके व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. संजय साबळे हे स्पर्धेचे समन्वयक आहेत.

No comments:
Post a Comment